Thursday, March 29, 2007

शाळेतील दिवस...

शाळा आणि शाळेतिल दिवस हा प्रत्येकाचा अगदि जिव्हाळ्याचा विषय असतो. कधि चुकुन शाळेत असणारे मित्र वाटेत आचानक भेटतात आणि थोडिशी विचारपुस झाल्यावर वेळ असेल तर हमखास निघणारा विषय म्हणजे शाळा आणि ते शाळेतिल दिवस. शाळेतिल शिक्षक त्यांना सतावण्यासाठीचे केलेले प्रयत्न, मित्रांबरोबर मजा करण्यात घालवलेला वेळ, क्लासेस, अभ्यास, परिक्षा आणि परिक्षेनंतरची सुट्टि या सर्वात तुम्ही कधि हरवता ते कळणारहि नाही या गोष्टि तुम्ही कधि विसरु शकत नाही आणि मी हि नाही. नुकतच शाळा हे पुस्तक वाचल आणि पुन्हा त्या विश्चात हरवलो.
पुर्ण १ ली ते १० वी पर्यंतचा लेखाजोखा द्यायला मला आवडला असता पण तो कोणालाही वाचायला आवडणार नाही म्हणुन माझ्या दहाविच्या वर्षातील काहि आठवणि देत आहे. माझ शिक्षण झाल ते वसईतिल 'न्यु इंग्लिश स्कुल' मध्ये १९९८ ची बॅच आणि १० अ चा वर्ग वर्गशिक्षिका म्हणुन लाभल्या त्या सापळे मॅडम पुर्ण शाळेतील विद्यार्थांना आवडणार व्यक्तिमत्व. सापळे मॅडमला आम्हि आधिपासुन ओळखायचो कारण त्या आम्हाला ९ वीत गणित शिकवायच्या. आमच्या शाळेत १० वी अ साठी ठरलेले शिक्षक असतात त्यामुळे शिक्षक कोण असणार याची उस्तुकता अशी नव्हतीच. शाळा भरायची १२.१५ ला पहिला तास सापळे मॅडमचा त्या उशिरा आल तरी काही बोलायच्या नाहीत. आमचा क्लास हा शाळेच्या आधि असायचा मॅडम काही बोलत नाही याचा फायदा घेऊन आम्हि (मी आणि माझे मित्र) मुद्दाम वेळ घालवुन नेहमिच उशिरा यायचो. पण काहि दिवसानी मुल्यशिक्षण हा नविन विषय आभ्यासक्रमात आला आणि आमच उशिरा येण बंद झाल मुल्यशिक्षणाचा झालेला एकुलता एक फायदा (शाळेसाठी) तोहि झाला कारण उशिरा येणा-याला मनाचे श्लोक वैगेरे शिक्षा म्हणुन म्हणावे लागत आणि उगाचच ती ब्याद नको म्हणुन आम्हि लवकर येऊ लागलो. मग त्या तासाला तसल्याच काहि तरी गोष्टी व्हायच्या तस आम्हाला त्यात तसा काहि इंटरेस्ट नव्हताच पण पहिल्या बाकांवर बसत असल्यामुळे लक्ष द्याव लागायच पण आमचे मागील बाकांवरील मित्र क्लासमध्ये दिलेला अभ्यास पुर्ण करुन घेत. मलाहि मागे जाऊन बसाव अस फार वाटायच पण उंची नसल्यामुळे तस कधि बसायला मिळालच नाही पण ही बॅकबेंर्चर्सची मजा मी कॉलेज मध्ये लुटली पण शाळा ती शाळाच.
त्या नंतर परत सापळे मॅडमचा तास हा तास मला फार आवडायचा कारण त्या तासाला डुलकी लागली तरी त्या काही बोलायच्या नाहीत. नंतरचा तास म्हणजे लेमॉस सरांचा इंग्लिश शाळेचे मुख्याध्यापक त्यांच 'मी या शाळेचा प्रिंसिपॉल आहे' हे वाक्य वर्गातल्या प्रत्येकाच्या लक्षात असेल. इंग्लिशला आम्हाला दोन शिक्षक होते लेमॉस सर आणि कुडु मॅडम त्या फक्त व्याकरण शिकवायच्या आणि लेमॉस सर धडे. लेमॉस सरांच्या तासाला ब-याच जणांची डबा खाण्याची तयारी आसायची कारण त्या नंतर मधलि सुट्टि असायची आम्हाला हुंदडायला वेळ मिळायचा पण नेहमी हे कुनी करत नसे. भिडे सरांचा गणित त्यांचा चेहरा नेहमी गंभिर असायचा पण ते फार चांगल शिकवत त्यांची एक गोष्ट आठवते ती म्हणजे ते वर्गात आले की सर्वांना दोन मिनिट उभ करत त्यांच म्हणन होत की विषयांतरासाठी दोन मिनिट आवश्यक असतात. मराठी साठी हरपनकर मॅडम आणि त्यांच्या तासाला विशेष अस काहिच होत नसे. संस्कृत साठी देशपांडे मॅडम त्यांच आणि आमच कधि पटलच नाही पुर्ण वर्ग त्यांच्या विरोधात होता त्या 'त' ला 'च' म्हणत आणि म्हणुनच मुलांनी त्यांच लोणची हे नामकरण करुन टाकल होत.
तसे आमच्या वर्गात दोन गट होते दोन वेगळ्या क्लासला जाणारे, मुलांमध्ये तस काही नसल तरी मुल आणि मुलिंमध्ये वाद हे होतच सुरवातिला ते फार व्हायचे पण नंतर ते कमी होत गेले.
हळुहळु दिवस जात राहिले आणि शेवटचा दिवस उजाडला प्रत्येकाला कॉलेजचे वेध लागले पण कॉलेज मध्ये गेल्यावरच कळत कि शाळेचे दिवस किती चांगले असतात मग मागे उरतात त्या फक्त आठवणी आणि असच मग वाचणात काहि तरी येत आणि मग मन परत त्यात हरवत त्यातच हे लिहुन काढल.